शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने ७०० कोटी शॉर्ट मार्जिनमध्ये साखरेचे दर घसरल्याने संकट : राज्य बॅँकेकडून मूल्यांकन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:59 IST

कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी २ जानेवारीपर्यंत ५९ लाख ७४ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे.

प्रकाश पाटील ।कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी २ जानेवारीपर्यंत ५९ लाख ७४ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, साखरेचे दर घसरल्याने शेतकºयांना एफआरपी अधिक २०० रुपये एकरकमी देण्यासाठी कारखानदारांना ओढाताण करावी लागत आहे. एकूण ऊस गाळपाचा विचार करता ७०० कोटी रुपयांचे शॉर्ट मार्जिन (अपुरा दुरावा) निर्माण झाल्याने जिल्ह्यातील कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

शेतकरी संघटनेने हंगामच्या सुरुवातीला प्रति मे. टन ३५०० रुपये ऊसदराची मागणी केली होती, पण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ऊसदराबाबत दोन बैठकीत कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यात समेट घडवून आणला व एफआरपी अधिक २०० असा तोडगा काढला. यावेळी साखरेचा दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र, हंगाम सुरू होताच नोव्हेंबर २०१७ पासून साखरेच्या दरात घसरण सुरू झाली. यामुळे साखर कारखान्यांना अर्थ पुरवठा करणाºया राज्य बँकेने उत्पादित प्रतिक्विंटल साखरेवर उचल देण्यास हात आखडता घेण्यास सुरुवात केली. २३ नोव्हेंबरला ३५०० रुपये असणारे साखर मूल्यांकन ११० रुपये प्रतिटन कमी करून ३३९० रुपये केले. यानंतर ७ डिसेंबरला १२० रुपये साखर मूल्यांकन कमी करण्यात आले, तर १९ डिसेंबरला पुन्हा यात मोठी कपात करून १७० रुपये साखर मूल्यांकन करण्यात आले.

या दोन महिन्यांत साखरेचे दर कमी झाल्याने तब्बल ४०० रुपये साखर मूल्यांकन कमी करून बँकेन्े ते ३१०० रुपयांपर्यंत केले. या मूल्यांकनाच्या ८५ टक्के म्हणजे २६३५ रुपये प्रतिक्विंटल उचल मिळणार आहे. पैकी ७५० रुपये प्रक्रिया खर्च, बँकेने दिलेल्या कर्जाच्या हप्ते व व्याज वसुलीसाठी उचल देतानाच बँक कपात करून घेते. यामुळे केवळ १८८५ रुपये ऊस दर देण्यासाठी कारखानदारांकडे शिल्लक राहात आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या एफआरपी + २०० असा फॉर्म्युला ठरल्याने सरासरी तीन हजार रुपये प्रतिटन ऊस दर ठरल्याने बँकेकडून मिळणारी १८८५ रुपये प्रतिटन उचल व उसासाठी द्यावा लागणारा २९०० ते ३१०० रुपये दर पाहता किमान ११०० ते १२०० प्रतिटन कमी पडणारे पैसे कुठून उभा करायचे, हा यक्षप्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला आहे.साखरेचे दर घसरल्यानंतर आयात बंदी, आयात कर वाढवणे, साखरेचा बफर स्टॉक करणे सरकारचे कर्तव्य आहे, पण सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे. शेतकºयांसाठी ऊस दर व घसरलेल्या साखर दराने निर्माण झालेल्या शॉर्ट मार्जिनची रक्कम सरकारने कारखान्यांना अनुदान रूपाने द्यावी.- चंद्रदीप नरके, आमदार१ १४ दिवसांत एफआरपी अदा करण्याचा कायदा धाब्यावर : शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ कलम ३अ नुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर त्या उसाची एफआरपी अदा केली पाहिजे. मात्र, आर्थिक अडचणीत सापडलेल्या कारखानदारांना दोन पंधरवडे झाल्यानंतर एका पंधरवड्याचे ऊस बिल अदा करण्याची वेळ आली आहे.२कोट्यवधीचे भागभांडवल राज्य बँकेकडे : दरवर्षी कारखानदार राज्य बँकेकडून कोट्यवधीचे पूर्व हंगामी कर्ज उचलतात. यातून बँक एक ते दीड टक्का भागभांडवल म्हणून बिनपरतीच्या ठेवी कपात करते. गेली ४० वर्षे असाच पायंडा चालू असून जिल्ह्यातील कारखान्यांच्या कोट्यवधीच्या बिनपरतीच्या ठेवी अडकून आहेत. यावर कधी व्याज दिले जाते कधी नाही. साखरेचे दर पडल्याने कारखानदारांना बँकेने मूल्यांकन कमी न करता मदत करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.३ शॉर्ट मार्जिनची रक्कम अनुदान म्हणून द्यावी : ऊसदर व साखरेचे घसरलेले दर यामुळे निर्माण झालेले शॉर्ट मार्जिन शासनाने कारखान्यांना अनुदान रूपाने मदत द्यावी, जेणेकरून शेतकºयांना वेळेत पैसे मिळतील.४पाच हजार कोटींचे टॅक्स :- साखर, ऊस खरेदी कर, अल्कोहोल, मळी प्रेसमड, बगॅस यासह अन्य सहउत्पादनावर केंद्र व राज्य सरकारला दरवर्षी पाच हजार कोटी रुपये कर रूपानेमिळतात.